शहरातील हागणदारीमुक्तीसाठी ‘गुड मॉर्निंग पथके’
देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे याकरिता या शहरामधील सर्व नागरिकांना शौचालयांची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र शासनामार्फत ‘स्वच्छ भारत अभियान (नागरी)’ संपूर्ण देशामध्ये राबविण्यात येत आहे.